Tuesday, March 23, 2010

माझी पहिली पोस्ट!

बऱ्याच दिवसान पासुन ब्लॉग सुरु करण्याची इच्छा होती. आज मुहुर्त लागला! संगणक क्षेत्राशी विशेष संबंध नसल्याने आणि शाळा संपल्यानंतर मराठी लिहिण्याची वेळ न आल्याने ब्लॉग सुरु करताना बरेच गमतीशीर अनुभव आले. त्यात ह्र्स्व-दिर्घाच्या चुका.... (ह्र्स्व टाईप करायलाच मला कमीत कमी १५ मिनिटे लागली हे वेगळं सांगयलाच नको)

इतर मराठी ब्लॉग वाचत असल्यामुळे, ब्लॉग कुठल्या संकेतस्थळावर सुरु करयचा हे जरी ठाऊक होतं, पण कसा सुरु करायचा.....घोडं तिथेच अडकलं होत.
माझ्या आणि कॉलेजात शिकत असलेल्या आजि व माजी विद्यार्थ्यांचा खरा देव असणाऱ्या गुगल डॉट कॉम ची मदत घ्यायचे ठरवले. (हल्ली शाळकरी मुले देखील ह्याच देवाला साकडं घालतात असं ऐकलयं... असेल बुवा... आमचं बालपण एवढं कष्टाचं नव्ह्तं..)

बऱ्याच शोधानंतर "क्विलपॅड" नावच्या एका सॉफ़्टवेअरची माहिती मिळाली. (सॉफ़्टवेअरला मराठीत काय म्हणतात ते मला ठाऊक नाही.... क्षमस्व) पण परत ते सॉफ़्ट्वेअर "इन्स्टॉल" (परत क्षमस्व....अन्ज्ञान दूर केल्यास उपकार होतील) करा... मग "रन" करा....हे सगळं कळल्यावर ब्लॉगचा विचार डामाडौल व्हायला लागला... शेवटी महत्प्रयासानी हे "बरहं" नावाचे सॉफ़्ट्वेअर सापडले... आमच्यासारख्या "अशिक्षीत" लोकांकरता कोण्या द्र्ष्ट्या व्यक्तिने विचार केला याचा मनोमन आनंद झाला आणि मी त्या व्यक्तीचे आभार मानून ह्या कार्याला श्रीगणेश केला!

पुढे काय लिहायचे हे काही ठरवले नाही.....काही सुचेल की नाही ह्याची पण कल्पना नाही....आणि मुख्यतः कुणी माझे ब्लॉग्स वाचेल तरी का ह्याची शाश्वती पण नाही....तरी सुद्धा एक उराशी बाळगलेलं स्वप्नं पूर्ण करण्याच्या इच्छेने हे कार्य हाती घेतलं आहे.... बघुया काय होतयं ते....

4 comments:

  1. अभिलाष, वा सुरुवात तर झाली आता काहीतरी सुचेलच आपोआप. जमलं तर बरहाच्या ऐवजी गुगल इमे वापरून बघ. इथे मिळेल http://www.google.com/ime/transliteration/
    तू सगळंच पहिल्यांदा वापरतो आहेस म्हणून सांगितलं. अनेक महिने /वर्ष बरहा वापरणार्‍यांना बरहाच सोप्पं वाटतं. मला नाही आवडलं. मला गुगल इमे खुपच सोप्पं आणि सुटसुटीत वाटलं. जमलं तर ट्राय करून बघ.

    ReplyDelete
  2. धन्यवाद हेरंब! पहिला प्रतिसाद तुझ्यासारख्या "प्रख्यात" ब्लॉगर कडून आल्याचा मला अत्यंत आनंद झाला! मी गूगल इमे वापरून बघिल. आताच एक नविन अपत्यं (नविन पोस्ट) जन्माला घातलं आहे. त्यावर तुझे मौलिक विचार कळल्यास आभार होतील.

    ReplyDelete
  3. Navin blog sathi manapasoon shubhecchaa.....!!!

    ReplyDelete